चिखलदरा ते सेमाडोह मार्गावर पडली झाडे

    18-Jul-2024
Total Views |
- अति पावसामुळे झाडे रस्त्यावर पडली
- मेळघाटात जोरदार पाऊस

Trees fell 
चुरणी :
गेल्या दोन दिवसांपासून मेळघाट परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी मार्गाची दुर्दशा झाली आहे. याबरोबरच मुख्य मार्गावर झाडे उन्मळून पडली आहेत.
 
चिखलदरा ते सेमाडोह आमाडोह मार्गावर झाडे पडल्याने मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. काही वाटसरुंनी झाडे बाजूला करून वाहने काढण्याचा प्रयत्न केला. जड वाहने निघणे कठीण असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांवरील पडलेली झाडे बाजूला करावीत अशी मागणी वाटसरुंकडून होत आहे.