ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा रील बनवताना दरीत पडून मृत्यू

    18-Jul-2024
Total Views |
Travel Influencer Anvi Kamdar Dies
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
महाराष्ट्रातील रायगडजवळील कुंभे धबधब्यावर इंस्टाग्राम रीलचे शूटिंग करताना सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अन्वी कामदार (२७) हिचा मृत्यू झाला. अन्वी एक प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर होती. तसेच ती ट्रॅव्हल संबंधित व्हिडीओ ती पोस्ट करायची. मंगळवारी आपल्या मैत्रिणींसोबत रीलचे चित्रीकरण करत असताना अन्वी कामदार ३५० फूट दरीत पडली.
 
अन्वी १६ जुलै रोजी सात मित्रांसह धबधब्यावर फिरायला गेली होती. ती रील बनवत असताना अचानक तिचा पाय घसरला. त्यामुळे ती खोल दरीत पडली. ६ तास बचाव कार्य सुरु होते.तटरक्षक दलासह महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त मदत मागितली गेली. अन्वी खोल दरीत सापडल्यावर रॅपलिंग दोरीला जोडलेल्या स्ट्रेचरचा वापर करून तिला वर पाठवण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने माणगावच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.