संस्कार भारती चंद्रपूरची विठू सावळी भजन संध्या

    18-Jul-2024
Total Views |
chandrapurs aashadhi
(Image Source : Internet) 
चंद्रपूर :
देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संस्कार भारती चंद्रपूर तर्फे भक्तीगीतांची सुश्राव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली. संस्कार भारती चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी एकाहून एक सुरेल भक्तीगीते सादर करत भजन संध्येत रंग भरला आणि संध्याकाळ विठू सावळी केली.
 
अपर्णा घरोटे यांनी गायलेल्या गणेश वंदनेने आरम्भ झालेल्या या भजन संध्येत मंगेश देऊरकर यांनी काळ देहासी आला या गाण्याने रंगत आली. तूझ्या कृपेने दिन उगवे हे भक्तीगीत डॉ राम भारत यांनी सादर केले. अनंता अंत नको पाहू ही आराधना जागृती फाटक यांनी सादर केली. देवाचीये दारी हे भक्तीगीत भावना हस्तक यांनी सादर केले. रूप पाहता लोचनी सुजित आकोटकर यांनी तर पूर्वा पुराणिक यांनी कृपाळे स्नेहाळे ही भक्तीगीते सादर केली. तूझ्या नामाचा विठ्ठल घोष हे गीत सादर करत प्रवीण ढगे यांनी भजन संध्येत रंगत आणली. प्राजक्ता उपरकर यांनी तोरा मन दर्पण कहलाये तर लिलेश बरदाळकर यांनी तू वेडा कुंभार हे भक्तीगीत सादर केले.
 
गाडी चालली सद्गुरू रायाची सौ जयश्री भारत यांनी, कभी प्यासे को पानी पिलाया नही हे विलास भारत यांनी, विजय जोशी यांनी ए कतारी संगे, परब्रम्हरुपीनी माते ही गीते संध्या जोशी यांनी सादर केली. विशेष म्हणजे 84 वर्षीय प्रा सुमती इंगळे यांनी विठ्ठल तो आला आला हे गीत भावपूर्ण पद्धतीने सादर केले. शोधून शिणला जीव हे गीत प्रवीण ढगे यांनी तर घागर घेऊन ही गौळण प्राजक्ता उपरकर यांनी सादर केली. अनघ निखिल पुराणिक या 6 वर्षीय बालकाने विठू माऊली तू हा अभंग सादर केला. स्वरा बरदाळकर या बाल गायिकेने हे भोळ्या शंकरा, अनया आणि अनिशा या बाल गायिकांनी पायोजी मैने राम रतन हे भजन सादर करत बलभक्तीचा उत्कट प्रत्यय दिला मंगेश देऊरकर यांनी गायलेल्या धन्य भाग सेवा का अवसर या भैरवीने सांगता झाली.'
 
सामूहिक जय जय रामकृष्ण हरीच्या गजराने भजन संध्येला प्रारंभ झाला. संस्कार भारती गीत गायन झाले. अध्यक्ष सौ संध्या विरमलवार यांनी आषाढी एकादशीचे महत्व विषद केले. पूर्वा पुराणिक यांनी आषाढ मास ही स्वरचित कविता सादर केली. भजन संध्येला अश्विनी भारत, पूनम झा, उषा बुक्कावार, झा, निखिल पुराणिक यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वनी संयोजन, हार्मोनियम वादन व गायन अशी तिहेरी भूमिका बजावत प्रवीण ढगे यांनी चतुरस्त्रतेचा परिचय दिला. तबला वादन लिलेश बरदाळकर, सुजित आकोटकर यांनी केली.