राष्ट्रवादीला सोबत घेणे कार्यकर्त्याला आवडलेले नाही; संघाने पुन्हा टोचले भाजपचे कान

    18-Jul-2024
Total Views |

RSS again criticizes BJP over alliance with Ajit Pawar 
 
नागपूर :
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या अपयशाला अजित पवार यांच्यासोबत केलेली युती कारणीभूत असल्याचे विधान पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साप्ताहिक विवेकमधून केला आहे. साप्ताहिक विवेक हे आरएसएस शी संबधित आहे.
 
काही आठवड्यांपूर्वी आरएसएस मॅगझिन ऑर्गनायझरने लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वर्णन अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी रिॲलिटी चेक असे केले होते. आता साप्ताहिक विवेकमधून लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर भाष्य केले. लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
भाजपा ’वॉशिंग मशीन’ आहे, भाजपाचा मूळ कार्यकर्ता केवळ सतरंजी उचलण्यापुरताच आहे, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विरोधकांनी केला; परंतु दुसरीकडे सोशल मीडियावरून हिंदुत्वाची बाजू मांडणार्‍या ज्येष्ठ मंडळींबाबतीत जो प्रकार काही व्यक्तींनी अगदी अलीकडे केला त्यामुळे चुटकीसरशी या अस्वस्थतेला बळ मिळाले आणि गावागावांत चुकीचा संदेश गेला हेही खरेच, असे साप्ताहिक विवेकमध्ये म्हटले आहे. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर अगदी दुसर्‍या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र दिसत असल्याचे या साप्ताहिकांमध्ये म्हटले गेले आहे.