खासदारांनी केली रेणुका नदीच्या पुलाची पाहणी

    18-Jul-2024
Total Views |
- मंगळवारी दोन तरुण वाहून जाताना थोडक्यात वाचले
 
अमरावती(Image Source : Internet) 
अमरावती :
भातकुली तालुक्यातील जावरा-कामनापूर रस्त्यावरील रेणुका नदीच्या पुलावरून जाणाऱ्या पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलस्वार वाहून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना वाचविले. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर मंगळवारी खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने या पुलाची पाहणी केली.
 
मंगळवारी शहरासह भातकुली तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नाले आणि नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. अशा स्थितीत भातकुली तालुक्यातील जावरा-कमनापूर रस्त्यावरून वाहणार्या रेणुका नदीच्या पुलावर पाणी वाहत होते. यावेळी दुचाकीवरून जात असलेले दोन युवक नदीच्या पुलावरून पाण्यातून मार्ग काढत होते. मात्र अचानक मोटारसायकल असंतुलित होऊन तो वाहून गेले. दोन तरुण वाहून जात असल्याचे दिसताच नागरिकांनी तात्काळ दोरी फेकून दोन्ही तरुणांचे प्राण वाचवले. या घटनेत मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही तरुणांचे प्राण वाचले. गावकऱ्यांनी अनेकदा या पुलाच्या निर्माणाकरिता प्रशासनाला अनेक निवेदन दिली आहेत, परंतू यामध्ये आतापर्यंत प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. आता या पुलाचे प्रकरण खा.बळवंत वानखडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्याने खा.वानखडे पुलाच्या निर्मीतीचा पाठपुरावा करतील अशी अपेक्षा ग्रामपस्थांना आहे.