पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार संवाद यात्रा

    18-Jul-2024
Total Views |
- म.रा.पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Journalist Samvad Yatra 
अमरावती :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पत्रकार संवाद यात्रा रविवार २८ जुलै रोजी नागपूर दीक्षाभूमी ते मुबंई मंत्रालयवर निघणार आहे. यात्रेच्या पूर्वतयारीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे बुधवार रोजी पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, प्रा. मनिष भकाळे, विजय गायकवाड उपस्थित होते.
 
बैठकीला मनीष जगताप, सागर तायडे, सागर डोगरे, गजानन मेश्राम, प्रशांत सुने, राजाभाऊ वानखडे, नकुल नाईक, पी एन देशमुख, गजानन जीरापुरे, सचिन पाटील, शेषनाग गजभिये, संजय मोहोड, गोपाल नरे, विनोद इंगळे, सागर डोंगरे, संजय तायडे, इमरान खान, हिमांशू मेश्राम, विवेक दोडके, विजय सौदागर, रवींद्र फुले, आकाश सौदागर, नागेश उंबरकर, राजेंद्र ठाकरे, उज्वल भालेकर, मीनाक्षी कोल्हे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य व विविध वृत्तपत्रांचे पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक शुभम मेश्राम यांनी केले.संचालन स्वप्नील सवाळे तर आभार अनिरुद्ध उगले यांनी मानले.
 
संवाद यात्रा राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांना ऐकण्याची आणि समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीचा बळकटीसाठी या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पत्रकाराने या यात्रेमध्ये सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांनी केले.