सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 59 प्रकरणांची नोंद

    18-Jul-2024
Total Views |
- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

public places 
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवारी १८ जुलै रोजी उपद्रव शोध पथकाने 59 प्रकरणांची नोंद करून 30 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला.
 
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
 
मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 5 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 21 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
 
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 01 प्रकरणांची नोंद
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरुवारी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपूरा झोन अंतर्गत पकंज इन्टरप्राईजेस बिनकर कॉलोनी तांडापेठ यांच्याकडून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय हनुमान नगर झोन अंतर्गत शशीकांत बोकाडे शिव हाईट्स अमर नगर, नेहरुनगर झोन अंतर्गत अक्षय कन्सट्रशन्स चैतन्य नगर खारबी आणि मंगळवारी झोन अंतर्गत ओशन कृष्णा गायत्री नगर झिंगाबाई टाकळी रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या तीन प्रतिष्ठानांकडुन एकुण 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 04 प्रकरणांची नोंद करून 35 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.