इनरव्‍हील क्‍लब ऑफ नागपूरतर्फे तुळशी रोपांचे वाटप

    18-Jul-2024
Total Views |
Innerwheel Club of Nagpur
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
इनरव्हील क्लब ऑफ नागपूरतर्फे (Innerwheel Club of Nagpur) आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. आठ रस्ता चौकात राबविण्‍यात आलेल्‍या या उपक्रमात नागरिकांना 200 हून अधिक तुळशीचे रोप वितरीत करण्‍यात आले.
 
इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ. शीला कुलकर्णी आणि सचिव डॉ. पूजा सावजी यांच्या मार्गदर्शनात आलेल्‍या या उपक्रमात आयपीडीसी शीला देशमुख, आयपीपी डी. आर. राजन, प्रकल्प संचालक सोनाली दळवी, पीडीसी मीना कुलकर्णी आणि इतर सदस्‍यांनी उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आषाढी एकादशीच्‍या दिवशी तुळशीचे रोपे मिळाल्‍यामुळे नागरिक भारावून गेले.