Punjab : तरनतारनमध्ये बीएसएफला मोठे यश; दारूगोळ्यासह अनेक चिनी शस्त्रे जप्त

    18-Jul-2024
Total Views |
Big success for BSF in Tarantaran
 (Image Source : Internet)
 
तरनतारन :
पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील सीमा भागात सीमा सुरक्षा दलाने चार चिनी पिस्तूल आणि ५० राऊंड पाकिस्तानी दारूगोळा जप्त केला आहे. तरनतारन जिल्ह्याच्या सीमा भागात मोहिमेदरम्यान सापडलेले एक संशयास्पद पॅकेट जप्त करण्यात आले आहे. बीएसएफचे जवान संशयित भागात पोहोचले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिवळ्या टेपमध्ये पॅकेट गुंडाळून त्याला एक धातूची रिंग आणि चार हलके रॉड जोडलेले होते. त्याची पॅकिंग उघडले असता आणखी चार छोटी पाकिटे आढळून आली. त्यामधील चार पिस्तूले आणि पिस्तुलांची रिकामी मॅगझिन जप्त करण्यात आली आहे. पॅकेटमध्ये आठ धातूच्या वायर पिनही सापडल्या आहेत. तरनतारन जिल्ह्यातील कलसियान गावाला लागून असलेल्या भागात ही शोधमोहीम राबविण्यात आली .