श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीचा संगीतमय कार्यक्रम उत्‍साहात

    17-Jul-2024
Total Views |
 - गरजू महिलेला सायकलचे वितरण
 
Sri Siddhivinayak Publicity musical program  
नागपूर :
श्री सिद्धीविनायक पब्लिसिटी द्वारा आयोजित ‘हिट्स ऑफ ऋषी अ‍ॅण्ड राजकपूर’ या कार्यक्रमात लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर व राजकपूर यांच्‍यावर चित्रित झालेल्‍या गीतांना गायकांनी सादर करीत रसिकांच्‍या टाळ्या, शिट्या, वन्समोअर घेतला.
 
लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात रविवारी झालेल्‍या या कार्यक्रमाची संकल्‍पना श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीचे संचालक समीर पंडीत यांची होती तर निकेता जोशी या अतिथी गायिका म्‍हणून उपस्‍थ‍ित होत्‍या. यावेळी लायन्स क्लब ऑफ नागपूर हेरिटेजतर्फे गरजू महिलेला सायकलचे वितरण करण्यात आले. लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन नितीन लोणकर, झोनल चेअरमन समीर पंडित, लायन्स क्लब ऑफ हेरिटेजच्या अध्यक्षा मृदुला हेडाऊ, विवेक वैद्य, अनघा वैद्य, शशीकांत वाघमारे, दत्तात्रेय वझरकर, अंजली वझरकर, विजया वाईंदेशकर, विवेक प्रतापे, सिद्धार्थ मेश्राम, सौ. हेडाऊ आदींची उपस्थित होते.
मोहिनी देशपांडे, आशिष पाटील, निरजा धांडे, प्रशांत अन्वाने, दीपा बत्तुलवार, शशीकांत वाघमारे, अनघा वैद्य, हर्षवर्धन वैरागारे, रूचिर झाडे, शर्वरी महाजन, दत्तात्रेय वसरकर, सुवर्णा पंत, विनोद आठवले, विजया वैंदेशकर, सतीश अंभोरे, अश्विनी पारधी, स्वप्ना पांडे, समीर पंडित या गायकांनी आपल्‍या सुमधूर गीतांनी रसिकांना मंत्रमुग्‍ध केले. किबोर्डवर परिमल जोशी, गिटारवर ऋग्वेद पांडे, ऑक्टोपॅडवर महेंद्र वातुळकर, ढोलकवर पंकज यादव आणि ड्रम्सवर राजू गजभिये यांनी उत्तम साथ दिली. आर. जे. तेजल यांनी आपल्या उत्तम संचालनाने रसिकांना खिळवून ठेवले.