नान्होरी येथील नवीन प्राथमिक केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न

    17-Jul-2024
Total Views |
 
Nanhori
 
ब्रह्मपुरी :
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर, आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्य परम-धनम-अंतर्गत नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा रविवार १४ जुलै २०२४ दुपारी २ वाजता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे यांच्या हस्ते शिलन्यांस व फित कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
 
नान्होरी ग्रामपंचायतीच्या सरपंच्या शुभांगी राऊत यांच्या हस्ते शिलन्यांस व फित कापून रुग्णवाहिकेचे लोकार्पण सुद्धा या प्रसंगी करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हा वास्तु सोहळा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अनुभवता यावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्वतयारी करण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयापासून मान्यवर मंडळीच्या स्वागतासाठी मिरवणुकीला सुरुवात झाली त्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते. बँड पथकाच्या तालावर परिसरातील नागरिक ताल धरून नाचत होते.तर महिलांनी सुद्धा रंगीबेरंगी पोशाख परिधान करून लेझीम पथकावर पारंपारिक नृत्य करीत होत्या.
 
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेश दारापर्यंत मिरवणूक येऊन थांबली. यावेळी पाहुण्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्याच्या आतिषबाजी करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने आरोग्य सेविकांच्या वतीने मान्यवरांचे टिका लावून जंगी स्वागत करण्यात आले. त्यामुळे हा लोकार्पण सोहळा आणखीनच! आनंद द्विगुणीत करणारा ठरत होता.
 
सर्वप्रथम मान्यवरांनी धन्वंतरी मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती क्रिष्णा सहारे यांनी केले. अध्यक्षस्थान नान्होरी ग्रामपंचायतीच्या सरपंच्या शुभांगी राऊत यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे, ब्रह्मपुरी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास दुधपचारे, विवेक पेंढे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग चंद्रपूर.पं.सं माजी सभापती वंदना शेंडे, उपसरपंच संजय शेंडे, माजी सरपंच शरद भोयर, अर्चना ढेंगे सरपंच ग्रां.पं. खंडाळा, माजी पं.सं.सदस्या ममता कुंभारे, अश्विनी राऊत कहाली. डॉ. आर के राकडे, माजी पं.स सदस्य अरुण शेंडे, डॉक्टर सुखदेव, डॉक्टर अंकुश अंडेलकर, डॉक्टर राहुल सहारे, डॉक्टर अमन पंडेल, डॉक्टर अभिजीत भूरले. यांच्यासह सामुदायिक आरोग्य कर्मचारी. व अन्य कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
 
याप्रसंगी मान्यवरांनी आप-पापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास लेनगुरे तर आभार नान्होरी ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय शेंडे यांनी मानले.