गव्हानिपाणी, रसूलपूर पहाटपट्टीमध्ये अवैध उत्खनन

    17-Jul-2024
Total Views |
- माजी आमदारांकडून प्रशासनाची कान उघाडणी

Illegal mining 
धामणगाव रेल्वे :
तालुक्यातील गव्हानिपाणी, रसूलपूर या गाव शिवारातील पहाडपट्टी भागात अवैध उत्खनन करुन मुरुमाची मोठ्याप्रमाणात चोरी केली जात आहे. या प्रकरणाची युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव समीर पाटिल यांनी पुढाकार घेऊन हे अवैध उत्खनन सुरु असल्याची माहीती माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना माहिती दिली. त्यानंतर जगताप यांनी महसूल प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.
 
गव्हानिपाणी व रसूलपूरमध्ये मुरुमाचे अवैध उत्खनन सुरु असताना, येथील तलाठी, मंडळ अधिकारी हे या प्रकाराकडे दुर्लक्ष करित आहेत. ही बाब माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून संबधित अधिका:यांच्या लक्षात आणून दिल्यावर सर्व यंत्रणा कामाला लागली. धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष पंकज वानखडे यांच्या नेतृत्वात एक निवेदनही तहसीलदारांना देण्यात आले. तसेच ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वैभव पावडे, विधानसभा उपाध्यक्ष विनीत टाले, जिल्हा प्रवक्ता व युवक काँग्रेस उपाध्यक्ष अज्जु पठाण, कृ.उ.बा.स. उपसभापती मंगेश बोबडे , कविश गावंडे, जिल्हा महासचिव युवक काँग्रेस ऋत्विक इंगळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.