ब्रम्हपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात

    17-Jul-2024
Total Views |
 
Bramhapuri
 
ब्रम्हपुरी :
गेल्या चाळीस वर्षांपासून ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे, या मागणीसाठी सतत आंदोलने करण्यात आली. मागील एक वर्षापासून जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलने अधिक तीव्र करण्यात आले. मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आणि जिल्ह्याच्या मागणीचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
 
याच अधिवेशनात नवीन जिल्हे आणि तालुके निर्मितीसाठी दांगट समितीचा अहवाल मागितल्याची प्रसार माध्यमावर बातमी प्रसिद्ध आल्याबरोबर ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती जिल्ह्याच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाली असून कोआज पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रम्हपुरी येथे समितीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. सदर उपोषण २३ तारखे पर्यंत सुरू राहणार असून आजच्या पहिल्या दिवशी प्रा. देविदास जगनाडे, डॉ. प्रेमलाल मेश्राम, राजू भागवत, विनोद झोडगे, प्रशांत डांगे, अविनाश राऊत, दत्तू टिकले, मंगेश फटीग, सुनील विखार, रमेश गणवीर, दीपक नवघडे हे उपोषणाला बसले.
 
त्यानंतर ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन देताना विनोद झोडगे, अविनाश राऊत, प्रशांत डांगे, देविदास जगनाडे, डॉ. प्रेमलाल मेश्राम, हरिश्चंद्र चोले, राजू भागवत, सुधाकर पोपटे, सुधीर शेलोकर, एम.दर्वे, दत्तू टिकले, पुष्पकर बांगरे, प्रभाकर अंबादे, दीपक नवघडे, सुरेश उपासे, सिध्देश्वर भरे, सुनील विखार, मंगेश फटिंग, दिवाकर नहाले आदी उपस्थित होते.