रायपूरमध्ये भरधाव ट्रक आणि सिटी बसची धडक; २० हून अधिक प्रवासी जखमी

    17-Jul-2024
Total Views |
Heavy truck and city bus collide in Raipur
 (Image Source : Internet)
 
रायपूर :
रायपूरमध्ये ट्रक आणि सिटी बसमध्ये जोरदार धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की, बसच्या सीट उखडल्या असून २० हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. बसमध्ये प्रवास करत असलेल्या अनेक प्रवाश्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्यामुळे बसमध्ये सगळीकडे रक्त पसरले होते.
 
माहितीनुसार, ही बस रायपूरहून खरोराकडे जात असताना विधानसभा पोलीस स्टेशन हद्दीतील सेमरिया गावाजवळ हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बस सेमरिया गावाजवळ येताच बस चालवणाऱ्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस थेट ट्रकला जाऊन धडकली. अपघातादरम्यान बसमध्ये सुमारे २५ ते३० प्रवासी होते, यामध्ये अनेक महिलांचा समावेश होता. अपघात होताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात ६ हून अधिक महिलांसह सुमारे २० जण जखमी झाले आहेत.