केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर २९ जुलै रोजी सुनावणी

    17-Jul-2024
Total Views |
Arvind Kejriwal
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
सीबीआयच्या अटकेला आव्हान देणाऱ्या अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर आता सोमवार २९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
 
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मोहरमच्या निमित्ताने न्यायालयांना सुट्टी असल्यामुळे न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केजरीवाल यांची बाजू मांडणारे प्रसिद्ध वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, ही अटक अतिरिक्त 'विमा अटक' आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना यापूर्वी तीनदा दिलासा मिळाला असताना. सीबीआयने केलेल्या अटकेला केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.