उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवारांचे हेलिकॉप्टर भरकटले; थोडक्यात बचावला जीव

    17-Jul-2024
Total Views |

DCM Fadnavis and Pawars chopper went astray
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
नागपूर ते गडचिरोली प्रवास करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत दोन्ही उपमुख्यमंत्री बचावले असून या हेलिकॅाप्टरमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते.
 
माहितीनुसार, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोली दौऱ्यावर जात होते. या प्रवासादरम्यान त्यांचे हेलिकॅाप्टर खराब वातावरणामुळे ढगात भरकटले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॅाप्टर ढगात भरकटल्याची माहिती समोर येताच प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेसंदर्भात स्वतः अजित पवार यांनी माहिती दिली. या घटनेमुळे माझ्या पोटात गोळाच उठला होता. मात्र, पांडुरंगाच्या कृपेने आम्ही सर्व सुखरुप खाली उतरलो.खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर ढगांमध्ये भरकटले होते. पंरतु, पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमिनीवर उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली, असे पवार म्हणाले.