नागपुरातील सदर उड्डाणपुलावर कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

    17-Jul-2024
Total Views |
 
Accident news
 
नागपूर :
शहरात दिवसेंदिवस रस्ते अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. सदर पोलीस ठाण्या अंतर्गत लिबर्टी चौकातील फ्लायओव्हरवर बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सुधाकर पाटील असे या दुचाकीस्वाराचे नाव असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी असून तो नागपुरात काम करतो. या प्रकरणी प्रकरणी सदर पोलिसांनी कार चालक चंद्रकांत इंगोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला.