सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकृती केंद्र सुरू राहणार

    17-Jul-2024
Total Views |
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना : आतापर्यंत 84 हजारावर अर्ज जमा

Application acceptance center will be open on holidays
 
नागपूर :
महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता (CM Majhi Ladki Bahin Yojana) नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये कार्यरत प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत. विहित मुदतीपूर्वी शहरातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरले जावेत यादृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे.
 
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेद्वारे २.५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमाह १५०० रुपये आर्थिक सहकार्य मिळणार आहे. या योजनेचा शहरातील जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयांमध्ये तसेच प्रत्येक प्रभागामध्ये अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अर्ज स्वीकारताना महिलांना कागदपत्रांची योग्य माहिती देणे तसेच त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याचे देखील काम या केंद्रांवरून केले जाते. स्वत: मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी विविध केंद्रांवर भेट देउन अर्ज स्वीकार करणारे कर्मचारी तसेच पात्र लाभार्थ्यांशी संवाद साधला आहे. शहरातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा व कुणीही योजनेपासून वंचित राहू नये यादृष्टीने बुधवारी सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकृती केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांचा निर्देशाप्रमाणे झोनचे सहायक आयुक्तांना त्यांचा झोनची या योजनेची जवाबदारी देण्यात आली आहे.
 
मनपाचे झोन कार्यालय तसेच प्रत्येक झोनमधील प्रभागात अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. याशिवाय आंगणवाडी केंद्रांमध्ये देखील अर्ज स्वीकारले जात आहेत. या व्यतिरिक्त लाभार्थी महिलांना स्वत: ‘नारी शक्ती दूत’ या मोबाईल ॲप वरूनही अर्ज करता येतो. ॲपमध्ये नाव, पत्ता, यासोबतच इतर माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज स्वीकारला जातो. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपा समाजविकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.
 
ऑनलाईन आणि ऑफलाईनरित्या 84884 अर्ज जमा
मनपाच्या दहाही झोनमध्ये आतापर्यंत एकूण 20761 अर्ज जमा झाले आहेत. यामध्ये 15655 अर्ज ऑफलाईन तर 5106 अर्ज आनलाईन जमा करण्यात आले. तसेच विधानसभा निहाय आंगणवाडी केंद्रांवर 46536 अर्ज ऑफलाईन तर 17587 अर्ज ऑनलाईन असे एकूण 64123 अर्ज जमा झाले आहेत. झोनमधील केंद्र आणि आंगणवाडी असे दोन्ही मिळुन 84884 अर्ज जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली.
 
येथे जमा करा अर्ज
 
लक्ष्मीनगर झोन
प्रभाग क्रमांक १६ : मनपा समाज भवन, गजानन नगर, नागपूर
प्रभाग क्रमांक ३६ : मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र पांडे लेआउट, नागपूर
प्रभाग क्रमांक ३७ : बुध्द विहार, कामगार कॉलनी, नागपूर
प्रभाग क्रमांक ३८ : मनपा समाज भवन, प्रगती सोसायटी, जयताळा, नागपूर
 
धरमपेठ झोन
प्रभाग क्रमांक १२ : मकर धोकडा मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक १३ : हजारी पहाड, मराठी, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक १४ : प्रियदर्शनी, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक १५ : नेताजी मार्केट मनपा शाळा, नागपूर
 
हनुमान नगर झोन
प्रभाग क्रमांक २९ : योगाभवन, मनपा नागपूर
प्रभाग क्रमांक ३१ : लालबहादूर शास्त्री मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक ३२ : दुर्गानगर मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक ३४ : हनुमान मंदीर, समाज भवन, मनपा, नागपूर
 
धंतोली झोन
प्रभाग क्रमांक १७ : जाटतरोडी हिंदी प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक ३३ : नरेंद्र नगर यूपीएचसी, नरेंद्र नगर नागपूर
प्रभाग क्रमांक ३५ : गणेश हनुमान मंदिर, हावरापेठ नागपूर
 
नेहरूनगर झोन
प्रभाग क्रमांक २६ : मराठी उच्च प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक २७ : संत ज्ञानेश्वर समाज, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २७ : नेहरूनगर झोन कार्यालय, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २८ : राजबाळ मराठी प्राथमिक शाळा, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक ३० : गणेश मंदिर, मनपा नागपूर
 
गांधीबाग झोन
प्रभाग क्रमांक ८ : फुटबॉल ग्राउंड, अंसारी नगर, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक १८ : गांधीबाग झोन कार्यालय, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक १९ : हंसापुरी खदान हायस्कुल, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २२ : अण्णाभाउ साठे वाचनालय, मनपा, नागपूर
 
सतरंजीपुरा झोन
प्रभाग क्रमांक ५ : सतधम्म बुद्धविहार, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २० : हिंदी प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक २१ : सतरंजीपुरा झोन कार्यालय, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक २१ : शांतीनगर प्राथमिक शाळा, मनपा शाळा, नागपूर
 
लकडगंज झोन
प्रभाग क्रमांक ४ : संत कबिर मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक २३ : समाज भवन
प्रभाग क्रमांक २४ : मराठी उच्च प्राथमिक शाळा
प्रभाग क्रमांक २५ : मनपा महारानी लक्ष्मीबाई शाळा, मनपा शाळा, नागपूर
 
आशीनगर झोन 
प्रभाग क्रमांक २ : कपिल नगर, प्राथमिक शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक ३ : समाज भवन, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक ६ : राणी दुर्गावती प्राथमिक शाळा, दुर्गावती चौक, नागपूर
प्रभाग क्रमांक ७ : बाळाभाउपेठ, आर सी एस सेंटर, नागपूर
 
मंगळवारी झोन
प्रभाग क्रमांक ११ : झिंगाबाई टाकळी, मनपा शाळा, नागपूर
प्रभाग क्रमांक १ : जरीपटका नारा आरोग्य नागरी सुविधा केंद्र, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक ९ : आरोग्य नागरी सुविधा केंद्र, मनपा, नागपूर
प्रभाग क्रमांक १० : हनुमान मंदीर, पचकमेटी एकता नगर, बोरगाव, गोरेवाडा, रोड, नागपूर