सुगत नगरातील पूरपरिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यास मनपा आयुक्त निष्क्रिय

    17-Jul-2024
Total Views |
- पत्रपरीषदेत माजी नगरसेवक सुरेश पचारेचा आरोप
- उचीत व्यवस्थापन न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
 
Sugat Nagar
 
चंद्रपूर :
चंद्रपूर शहरातील तुकूम प्रभाग क्रमांक 2 मधील सुगत नगर येथे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे गेल्या दोन वर्षापासून पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मनपा प्रशासन कोणत्याही प्रकार उपाययोजना व विकासकामे करण्यास असमर्थ ठरत आहे, असा आरोप तुकूम प्रभाग क्रमांक 2 चे माजी नगरसेवक सुरेश पचारे यांनी मंगळवार 16 जुलै ला श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरीषदेत केला आहे.
 
15 दिवसात परीसरात जमा होणाऱ्या पाण्याचा निचरा व्यवस्थापन न केल्यास परीसरातील रस्त्यावर अथवा मनपा चे समोर आंदेालन करून मनपा ला कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
 
पत्रपरीषदेत सुरेश पचारे ने सांगितले की, चंद्रपूर शहरातील तुकूम प्रभाग क्रं. २ मध्ये महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या दोन वर्षापासून पावसाळ्यात पुरपरिस्थीती निर्माण होत आहे. पावसाचे पाण्याचा निचरा होण्यासाठी महानगरपालिकेने आतापर्यंत कुठलीही उपाययोजना केली नाही. या भागात मनपाने विकास कार्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. या भागात नाली, रस्ते तयार करण्यात यावे अशी वारंवार निवेदन, सुचना महानगरपालिकेला माजी नगरसेवक सुरेश पचारे व परीसराती नागरीकांनी दिले आहे. याबाबत मनपा आयुक्त एकदा या भागाची पाहणी देखील करून गेले आहे. मात्र पाहणी केल्यानंतर मनपा आयुक्तांनी निष्काळजीपणा दाखवत या भागातील रहिवाशांना समस्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली नाही. याचा परिणामी या भागातील नागरिकांना दोन वर्षांपासून पावसाचे पाणी घरात घुसून सामानाचे नुकसान सहन करावे लागत आहे.
 
तुकूम परीसरातील छत्रपती नगर व वेकोली वसाहत पासून पाणी उतार असल्याने येत असते. मागील काही वर्षापासुन सुगत नगर, कृष्णा रेसीडेन्सी, श्रीकृपा नगर, पोस्टल कालोनी परिसरात पावसाळ्यात पाण्याचे मोठमोठाले लोंढे घरात घुसून घरातील किंमती सामान दुचाकी, चारचाकी वाहने, घरातील मौल्यवान वस्तु, जीवनावश्यक वस्तु, धान्याची नासधूस होत आहे. यामुळे येथील नागरिकांनी मनपा आयुक्तांच्या निष्क्रीय कार्यप्रणाली विरोधात संताप व्यक्त केला आहे. महानगरपालिका शहरात कोट्यवधी रुपये विकासाच्या कामाचे मोठमोठाले दावे करीत असते मात्र प्रत्यक्षात आजही अनेक भागात साधे नाली, रस्त्याचे काम देखील झाले नाही. सुगतनगर भाग अजुनही अविकसीत आहे. सुगत नगर ते सिध्दीप्रिया अपार्टमेंट पर्यंतच्या परीसरात 4 ते 5 फुट पर्यंत पाणी साचले होते.
 
दरवर्षी पावसामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याना व नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागाला विकासापासून दुर ठेवण्यात आले. महानगरपालिकेने सुगत नगर मध्ये त्वरीत नाली व नाला बांधकाम करावे जेनेकरून पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही. केलेल्या कामाचे क्रेडीट घेण्याचा विषय सोडुन जनतेच्या समस्यांचे निराकरण करने हे मनपा प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे.
 
महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यास पररीसराती शेकडो नागरिकांसह मनपा समोर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक सुरेश पचारे ने महानगरपालिकेला पत्रपरिषदेतून दिला आहे. पत्रपरीषदेला माजी नगरसेवक सुरेश पचारे सह शुभम वैद्य, पंकज दोनारकर, स्वाती चिंतलवार, राधा वैद्य, मनोज सावसाकडे, ईश्वर ठाकरे, विष्णु बुरडकर, अस्लम शेख, दिलीप देहारकर, महेश मत्ते सह परीसराती अन्य नागरीक उपस्थित होते.