वृक्षलागवडचा पहिला टप्पा पांगरकर नगरमधून

    17-Jul-2024
Total Views |
- आदिवासी पर्यावरण संघटनेचा उपक्रम
- आर्ट ऑफ लिविंग ग्रुप करणार संवर्धन

tree plantation 
परतवाडा :
सालाबादाप्रमाणे आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेने पाऊस पड़ताच आपले अभियान ‘आपले शहर-हिरवे शहर’ या उपक्रमाला सुरुवात केली आहे. परतवाडा-अचलपूर येथील आर्ट ऑफ लिविंग ग्रुपच्या सहकार्याने पांगरकर नगर येथे 35 देसी प्रजातीचे रोपटे लावून वृक्षलागवड सुरुवात केली आहे. यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे शिक्षक प्रदीप खंडेलवाल, सुधीर ठवली प्रोजेक्ट डायरेक्टर यांच्या मदतीने तथा आर्ट ऑफ लिविंगचे शेकडो सदस्य यांनी वृक्षलागवड साठी पुढाकार घेतला.
 
दरवर्षी वाढते तापमान, बदलते ऋतुचक्र, ग्लोबलाइजेशन तथा येणाऱ्या पीढीच्या भविष्याचा विचार करुन 14 वर्षांपूर्वी काही पर्यावरणाप्रति ध्येयवेडे असलेल्या व्यक्तिंनी पर्यावरण तथा आपले शहर वाचविण्यासाठी एकत्र येत वृक्षारोपणाचा उपक्रम सुरु केला. मुठभर लोकांनी सुरु केलेला हा उपक्रम आता एका चळवळीत रुपांतरीत झाला आहे. याच आदिवासी पर्यावरण संस्थेसोबत अनेक सामाजिक संस्था सोबत जुळून वृक्षअभियान राबवित आहे.
 
आपले शहर-हिरवे शहर करण्याचा प्रण या मंडळींनी घेतला आहे. यावेळी आदिवासी पर्यावरणचे योगेश खानजोडे, गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी, विजय गोडचोर, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती, सुरेश प्रजापति, माहेर फाऊंडेशनच्या दीपा तायडे, शारदा उईके , जेसिआयचे राजेश अग्रवाल, पंकज शर्मा, रवी गुप्तासह आर्ट ऑफ लिविंगचे प्रदीप खंडेलवाल, सुधीर ठवळी, विलास जवंजाळ, संजय जैस्वाल, राजेश खंडेलवाल, राजीव सरोदे, सुधीर राहाटे, विनोद तट्टे, प्रमोद झवंर, मनीष खंडेलवाल, अभय काथोटे, विनोद उमाळे, विनय खंडेलवाल, डी.एम.नेतनराव, वनमाला उमाळे, ज्योती खंडेलवाल यांच्या हस्ते वृक्षरोपण करुण संगोपन-संवर्धनची शपथ घेण्यात आली.