नागपुरात अजब बंगल्यात ठेवण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे!

    16-Jul-2024
Total Views |

Wakhnakhe be kept in Ajab Bungla in Nagpur
 
 
नागपूर :
अफजल खान याचा कोथळा काढताना ज्या वाघनखांची (Waghnakhe) चर्चा होते, ती शिवरायांची वाघनखं ३ वर्षांसाठी भारतात आणण्यात येणार आहे. या अनुषंगाने नागपूरसह राज्यभरातील म्युझियममध्ये ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
 
नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील अजब बांगला (सेंट्रल म्युझियम) येथे वाघ नखं प्रदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. देशभरातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला संपवण्यासाठी जी वाघनखं वापरली, ती येत्या 19 जुलै रोजी भारतात येणार आहे. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अलबर्ट संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार होणार आहे. पुढील तीन वर्षासाठी ही वाघनखे भारतात असणार आहेत.
 
सांस्कृतिक विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, व्हिक्टोरिया आणि अलबर्ट संग्रहालय 3 वर्षांसाठी ही वाघनखं महाराष्ट्र सरकारला देण्यास तयार झालं आहे. महाराष्ट्रातील चार प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा, नागपूरमधील केंद्रीय संग्रहालय आणि कोल्हापूरचा लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी या वाघनखांच दर्शन घेता येईल.