पीओपीमध्ये लपवलेली सोन्याची माळ चोरी

    16-Jul-2024
Total Views |
- प्लंबरनेच केला हात साफ
 
Theft of gold stash hidden in POP
(Image Source : Internet/ Representative)
 
अमरावती :
चोराच्या भीतीने पीओपीमध्ये लाईटच्या डबीत लपवून ठेवलेल्या सोन्याच्या मोहन माळेवर प्लंबरनेच हात साफ केल्याची घटना गाडगेनगर पोलिस स्टेशनअंतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्लंबरला ताब्यात घेवून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला.
 
शुभम माणिकराव बोबडे (26, रा. काकडा ता. अचलपुर जि. अमरावती) असे व्यवसायाने प्लंबर असलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून गुन्ह्यातील 1 लाख 53 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
2 जुलै रोजी प्रमोद माणिकराव तायडे (रा. विलास नगर गल्ली नं 4,. अमरावती) यांच्या घरात पी.ओ.पीमधील लाईट फिटींग सुरु होते. त्यासाठी त्यांनी शुभम नावाच्या मुलाला बोलाविले होते. त्यावेळी पीओपीच्या लाईटच्या डबीमध्ये ठेपलेली सोन्याची मोहन माळ चोरी गेली होती. या घटनेच्या अनुषंगाने प्रमोद यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून, शुभम नावाच्या इसमावर चोरीचा संशय व्यक्त केला होता. सदर गुन्ह्यात गाडगेनगर पोलिसांनी सदर संशयीत ईसम शुभम यांला ताब्यात घेऊन, विचारपूस केली असता, त्याने चोरी केल्याचे कबुल केले. त्यामुळे पोलिसांनी त्याला सदर गुन्ह्यात अटक केली.