डॉ अरुण पांडे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

    16-Jul-2024
Total Views |
- ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे आयोजन
 
Dr Arun Pandey
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भतर्फे डॉ. अरुण पांडे (Dr Arun Pandey) यांच्‍या सुगम संगीताचा कार्यक्रम ज्येष्ठ विरंगुळा केंद्र हनुमाननगर, येथे सोमवार पार पडला. डॉ. अरुण पांडे यांनी आपल्‍या सुमधूर आवाजात विविध गीते सादर करून श्रोत्‍यांना मंत्रमुग्‍ध केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ सचिव ॲड. अविनाश तेलंग आणि लीलाधर रेवतकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
जय शारदे वागेश्वरी या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झज्ञला. आधा है चंद्रमा, शुक्रतारा मंद वारा, मन तडपत हरी दर्शन, आंसू भरी है जीवन की राहे, तुझे गीत गाण्यासाठी, छु लेने दो नाजूक होटो कॊ, अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून डॉ. पांडे यांनी भाव-सूर-ताल यांचा सुरेख संगम प्रस्‍तुत केला. कार्यक्रमाला समारोप त्‍यांना मोगरा फुलला व नंतर तुज मागतो मी आता या गीताने केला.
 
कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन अंजली पांडे यांनी तर प्रास्ताविक अनिल पात्रीकर यांनी केले. श्याम पातूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला हेमंत शिंगोडे, विनोद व्यवहारे, प्रकाश मिरकुटे, चंदुजी तिवारी, दीपक शेंडेकर, उल्हास शिंदे, ईश्वर वानकर, सुरेश बागडदेव, राजेंद्र कळमकर, संध्या कळमकर आणि अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.