ग्राहकाच्‍या मनोज्ञानावर आध‍ारित 'विक्री'ची कला - आलोक धोटेकर

    16-Jul-2024
Total Views |
Customer Psychology
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
विक्रीची संकल्पना ही ग्राहकांच्या मनोविज्ञानावर (Customer Psychology) आधारित असते. मनोविज्ञानाला केंद्रस्थानी ठेऊन उत्पादन किंवा सेवा ग्राहकांना किती कलात्मकरित्या तुम्‍ही विकता यात विक्री किंवा सेल्सचे यश अवलंबून असते, असे प्रतिपादन 'द राइट अँगल'चे नॉलेज रिसोर्स आणि दिनशॉ येथील माजी एव्हीपी-सेल्स पर्सन आलोक धोटेकर यांनी केले.
 
विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे चिटणविस सेंटर येथे आयोजित साप्ताहिक सत्रात ते ‘ग्राहकांचे मन वाचण्याची कला’ या विषयावर बोलत होते.
 
विक्रेत्यांनी आपली उत्पादने विकताना भावनिक न होता धोरणात्मक विचार केला पाहिजे यावर धोटेकर यांनी भर दिला. ग्राहक कसे किंवा का खरेदी करतात आणि ते का करत नाहीत हे समजून घेण्यासाठी त्यांनी ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. असे करताना तुमचा ब्रँड आणि ग्राहकाच्या गरजा या दोन्ही समजून घेणे महत्वाचे ठरते. बाजारात आणि खरेदीदारांद्वारे तुमच्या ब्रँडकडे कसे बघितले जाते हे जाणून घेतल्याने आत्मविश्वासाने विक्री करण्यात आणि ग्राहकांच्या खरेदी वर्तनाचे विश्लेषण करण्यात मदत होते असे त्यांनी सांगितले.
 
धोटेकर यांनी उपस्थितांना विक्रीचा 8/73 नियम, ग्राहकांच्या हरकती कश्या सोडवायच्या यावर देखील मार्गदर्शन केले. सत्राचे संचालन महेंद्र गिरधर यांनी केले, तरूण कटियार हे सत्र प्रभारी होते.