'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा भगिनींनी लाभ घ्यावा

    16-Jul-2024
Total Views |
 - माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांचे आवाहन
 
Chief Minister Majhi Ladki Bahin Scheme
(Image Source : Internet) 
रामटेक :
राज्याच्या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये शासनाकडून मिळणार आहे. तेव्हा रामटेक विधानसभा मतदार संघातील जास्तीतजास्त भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामटेक विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केले आहे.
 
२१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला भगिनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. १ जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, आधार लिंक बँक खाते, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शेती ५ एकर पेक्षा जास्त नसावी अशा अटी रद्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाइल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरावे. सुविधा अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्रात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सांगितले.