राज्य सरकारकडून बेरोजगार महिलांना नोकरीची सुवर्णसंधी; अंगणवाडी मदतनीससाठी तब्बल 14,690 जागांची भरती

    16-Jul-2024
Total Views |

Recruitment of 14690 Vacancies for Anganwadi Helper
 
 
नागपूर :
राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. सरकारकडून बेरोजगार महिलांना नोकरीची संधी मिळणार आहे.
 
महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीस यांच्या भरतीची एक मोठी घोषणा जाहीर केलेली आहे. या भरतीच्या अर्ज करण्याची प्रक्रिया देखील चालू झालेली आहे. 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर लवकरात लवकर अर्ज करा.
 
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीस यांची तब्बल 14690 रिक्त पदे आहेत. ती रक्त पदे भरण्यासाठी आता अधिसूचना निघालेली आहे. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी अर्ज करावा असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले.