खासदार सुनेत्रा पवारांनी मोदीबागेत घेतली शरद पवारांची भेट

    16-Jul-2024
Total Views |
Sunetra Pawar met Sharad Pawar
 (Image Source : Internet)
 
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची मोदीबागेत भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार मंगळवारी पुण्यातील मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
 
खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. पण ही चर्चा नेमकी कशाबद्दल होती, हे अद्याप कळू शकले नाही.
 
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेतून निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या. तर सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून नियूक्ती करण्यात आली. या सर्व घडामोडीनंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.