पॉलिश करण्याची बतावणी करुन दागिने लंपास

    16-Jul-2024
Total Views |

- दोन भामट्यांवर गुन्हा दाखल

Looming jewellery under the pretense of polishing
(Image Source : Internet/ Representative)
 
खल्लार :
पावडरने सोन्याचा हार पॉलिश करून देण्याची बतावणी करन, एका महिलेची फसवणूक करण्यात आली. ही घटना खल्लार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणात महिलेचे पती शालिकराम मोतीराम नवरंगे (रा.साखरी) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील साखरी गावातील रहिवासी शालिकराम नवरंगे यांच्या पत्नीला दोन तरुणांनी भैय्या नावाच्या पावडरने सोन्याचे दागिने चमकविण्याची बतावणी केली. त्यावर महिलेने त्यांना घरातील सोनसाखळ्या आणून दिल्या. मात्र, यादरम्यान दोन्ही तरुणांनी महिलेला बोलण्यात गुंतवून तेथून पळ काढला. या घटनेनंतर महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. याप्रकरणी पती शालिकराम यांनी खल्लार पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.a