‘कांहे’ गीताने रसिकांना दिला संगीताचा ताजा अनुभव

    16-Jul-2024
Total Views |
- रिद्धी विकमशीच्‍या कार्यक्रमाला रसिकांनी केली गर्दी
 
Kaanhe Song Gave Audiences a Fresh Musical Experience
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
बॉसा नोवा, जाझ आणि हिंदुस्‍तानी शास्‍त्रीय संगीताचा सुरेख मेळ आणि नवोदित गायिका व संगीतकार रिद्धी विकमशी हिची हटके गायनशैली ऐकायला युवा व ज्‍येष्‍ठ रसिकांनी चिटणवीस सेंटरच्‍या टॅमरिंड हॉलमध्‍ये चांगलीच गर्दी केली होती.
 
प्रसंग होता रिद्धी विकमशीच्‍या ‘कांहे’ या गीताच्‍या विमोचन सोहळ्याचा रविवार झालेल्‍या या कार्यक्रमात रिद्धीने तिची आई व गीतकार मिली विकमशी यांनी लिहिलेल्‍या गीतांना सादर केले. रिद्धी व तिचे सहकारी सुमेन नाईक, अँटोनी मॅथ्‍यू आणि बर्कली कॉलेज ऑफ म्‍युझिकच्‍या विद्यार्थ्‍यांनी हे गीत तयार केले हेाते.
 
बर्कली कॉलेज ऑफ म्‍युझिकमध्‍ये शिकत असताना रिद्धी विकमशी, सुमेर नाईक व अँटोनी मॅथ्‍यू यांनी संगीतबद्ध केलेले ‘कांहे’ हे गीत सादर करताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रिद्धीने ‘सैयां नाही बोलूंगी’, ‘ख्‍वाब अधुरा’, ‘सुनों मोरे मोहन’, ‘नाम इश्‍क का’ अशी विविध गीते सादर केली. सुमेरने गीटारवर, आदित्‍य पहुजा व कनक मसरामने तब्‍यल्‍यावर, ऋतूपर्ण बरगटने व्‍हायोलिनवर, वल्‍लभ कावरेने बासरीवर उत्‍तम साथसंगत केली. ध्‍वनी संयोजन संदीप पाटील यांचे होते. यावेळी ज्‍येष्‍ठ मूर्तिकार हिराचंद विकमशी, डॉ. साधना शिलेदार, कवी डॉ. अविनाश बागडे व सदब अंजुम, पूनम तिवारी, संगीतकार म‍िलीन चिटणवीस, आर्कि. चव्‍हाण, आर्कि. मोखा, आरजे प्रीती, डॉ. कामायनी देशपांडे, निशिकांत देशमुख, अतुल प्राजक्‍ता, तनवीर म‍िर्झा, ॲड. नितीन बरगट, फ्रोन्सिस सचिन पिटर, कपिल साविकर, ललित व तनुल विकमशी यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्‍थ‍ित होते.