‘संगीत सौभद्र’ चा अभिनव प्रयोग

    16-Jul-2024
Total Views |
Innovative experiment of Sangeet Saubhadra
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
नवीन पिढीला संगीत नाटकांची ऋची वृद्धिंगत करता यावी, या उद्देशाने साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत नारायण जोशी यांनी ‘संगीत सौभद्र : नच सुंदरी करू कोपा’ चा अभिनव प्रयोग नुकताच सादर केला. प्रा. वामनराव जोशी यांच्या निवासस्थानी झालेल्‍या या नाट्य प्रवेशाला वय वर्ष ९ ते ९० पर्यंतचे रसिक उपस्‍थत होते.
 
या प्रवेशचे संपादन दिग्दर्शन व निर्मिती तसेच, श्री कृष्णाची भूमिका नारायण जोशी यांनी केली तर कवयित्री रेखा शुक्ला यांनी रुख्मिणीची भूमिका दमदारपणे साकार केली. श्री नांदी, नभ मेघांनी आक्रमिले, नच सुंदरी करू कोपा गर्भ गुरु ते घेतले वंश करोनी, कोण तुज सम सांग, व प्रिये पहा अशी एकाहून एक सरस नाट्यगीते त्‍यांनी सादर केली. योगतज्‍ज्ञ रामभाऊ खांडवे यांच्या हस्ते दोन्‍ही कलाकारांचा सत्‍कार करण्‍यात आला. जयंत पोहनकर यांनी तबल्यावर तर चंद्रकांत पहाडे यांनी संवादिनीवर उत्कृष्‍ट साथसंगत केली.