चांदूरबाजारला कायमस्वरूपी तहसीलदार द्या!

    16-Jul-2024
Total Views |
- लोकविकास संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
 
Give Chandur Bazar a permanent Tehsildar

 
चांदुर बाजार :
तालुक्यातील तहसील कार्यालयात मुख्य तहसीलदार पद हे प्रभारी असून त्याचबरोबर अतिरिक्त तहसीलदार यांचे पदरिक्त असल्यामुळे अनेक कामाचा बोजवारा उडालेला दिसत आहे. तहसील कार्यालयातील अधिकार, कर्मचाऱ्यांवर वाचक नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामूळे या ठिकाणी कायमस्वरुपी तहसीलदार देण्याची मागणी लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव यांनी केली आहे.
 
जिल्हाधिकारी यांना दिलेला आपल्या निवेदनात केली आहे. तसेच तहसील कार्यालयात ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी महिलांची आणि शैक्षणिक कागदपत्र तिच्या पूर्ततेसाठी विद्यार्थी यांची गर्दी अधिक होत असल्याने तहसीलदार उपस्थित नसल्यामुळे सर्वांची गैरसोय होत आहे. तसेच एकाच तहसीलदारावर सर्व विभागाचा लोड आल्याने काम होतनाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन तहसील कार्यालयाचा कारभार सुरळीत करण्यासाठी मुख्य तहसीलदार सह नायब तहसीलदार यांचे रिक्त असलेले पद भरण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील भालेराव यांनी आपल्या निवेदनात यांनी केली आहे.