'गीत गाता चल' हिंदी गीतांचा कार्यक्रम रंगला

    16-Jul-2024
Total Views |
Geet Gata Chal program of Hindi songs
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
शिल कला सागर (सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक) संस्थेचे सचिव योगेश राऊत आणि साई सर्वांगीण ग्रामीण समाज विकास संस्था, कुहीचे अध्यक्ष आनंद खडसे, अजित बालक मंदिर वाडीचे अध्यक्ष रामदास मानेराव, निलशोभा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव नितीन पात्रीकर, लोककला शाहीर मंडळ कुहीचे सदस्य रोमदेव शेषराव शेबे, राष्ट्रसंत सम्यक संदेश फाउंडेशन सातारा, कुहीचे संदेश गणवीर, मागासवर्गीय गोपाळ समाज कल्याणकारी संस्था माहूरझरीचे अध्यक्ष अशोक लोणारे या सर्व संस्थांच्या सहयोगाने सोमवारी विदर्भ हिंदी साहित्य संघाच्‍या उत्कर्ष हॉलमध्‍ये "गीत गाता चल.." हा हिंदी गीतांचा कार्यक्रम पार पडला.
 
यात ७० ते ९० च्या दशकातील जुन्या गीतांची मेजवानी रसिकांना मिळाली. नवोदित गायकांना संधी देण्याच्या दृष्टीने आयोजित या कार्यक्रमात अरूणा चौधरी यांनी बागों में बहार है, नरेंद्र इंगळे यांनी खोया खोया चांद, योगेश राऊत व शारदा लांजेवार यांनी हाल कैसा हे जनाब का, आसावरी डांगे यांनी दिल है के मानता नहीं तर विनोद बोबडे यांनी बेखुदी में सनम ही गीते सादर करून समा बांधला. नरेंद्र इंगळे यांनी योगेश राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बार बार ये दिन आये है गीत सादर केले. रोशन ठाकरे, आरती सिंग, अक्षय ढोले, उज्वला कांबळे, प्रमोद माटे, जया माटे, प्रफुल हजारे, अनामिका बडबोले, सुनील बेहेरे, अनिता झोडापे, जयश्री जाधव, राजेश शिवहरे, संगीता नेताम, गोविंदा, रवी कुमार यांचाही यात सहभाग होता. प्रमुख पाहुणे म्‍हणून उर्मिला वाल्दे-राऊत, विलास कुबडे यांची उपस्थिती होती. निवेदन योगेश राऊत यांनी केले तर प्रथमेश राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता नमिता राऊत, जितेश पाटील, भावना मुखर्जी यांचे सहकार्य लाभले.