डोडा येथे झालेल्या चकमकीत ४ लष्करी जवानांना वीरमरण

    16-Jul-2024
Total Views |
Four Soldiers Martyred in Encounter at Doda
 (Image Source : Internet/ Representative)
 
जम्मू- काश्मीर :
जम्मू-काश्मीरमधून दुःखद बातमी समोर आली आहे. जम्मू विभागातील डोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत चार जवानांना वीरमरण आले आहे, तर एका लष्करी अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. कॅप्टन ब्रिजेश थापा, नाईक डी राजेश, शिपाई बिजेंद्र आणि शिपाई अजय, अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.
 
 
 
राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी रात्रीच्या सुमारास देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उर्बगी येथे संयुक्त घेराव आणि शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ गोळीबार सुरूच होता. यादरम्यान लष्कराच्या जवानांना गोळ्या लागल्या. त्यांना रुग्णालयात आणले असता मध्यरात्री त्यांना मृत घोषित करण्यात आले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना डोडा येथील चकमकीची माहिती दिली.
 
 
ADG PI- भारतीय सैन्याने X द्वारे शोक व्यक्त केला आहे. कॅप्टन ब्रिजेश थापा, नाईक डी राजेश, शिपाई बिजेंद्र आणि सिपाही यांनी दहशतवादाचा सामना करताना आपले प्राण गमावले. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनीही शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला सरकार उत्तर देईल. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता राखणे हे आमचे कर्तव्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शोक व्यक्त केला आहे. उरार बग्गी, डोडा येथे दहशतवादविरोधी कारवाईत शूर भारतीय सैन्याचे जवान शहीद झाल्यामुळे खूप दु:ख झाले आहे. बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राष्ट्र खंबीरपणे उभे आहे. दहशतवादविरोधी कारवाया सुरू असून आमचे सैनिक दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी आणि प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी कटिबद्धअसल्याचे ते म्हणाले आहेत.