एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

    16-Jul-2024
Total Views |
Ek rupayat pik vima
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क/मुंबई :
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दिनांक १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली.
 
सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्यशासनाच्या कृषी विभागाच्यावतीने पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच असून मंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते.
 
त्यानुसार एक रुपयात पिक विमा भरण्याचे मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.