लाडकी बहिणच्या अर्जावर स्वत:चा फोटो

    16-Jul-2024
Total Views |
- आमदार देवेंद्र भूयारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
 
Demand to file a case against MLA Devendra Bhuyar

 
वरूड :
लाडकी बहीण योजनेचा प्रणेता म्हणून आ. देवेंद्र भुयार यांनी स्वतःचा फोटो प्रकाशित करून अंगणवाडी सेविकेकडून अर्जाच्या वाटप सुरू केले. ज्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी आ. भूयारवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी तालुक्यातील भाजपा तसेच विक्रम ठाकरे मित्र परिवाराच्या वतीने गुरुवारी तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयात दीड तास ठिय्या आंदोलनसुध्दा करण्यात आले.
 
लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 रुपये लाभ मिळणार आहे. योजनेचा नारी शक्ती ॲप असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. मात्र आ. देवेंद्र भुयार यांनी तहसीलदार, पंचायत समिती गट विकास अधिकारी यांची अशासकीय बैठक आयोजित करून या योजनेचा प्रणेता मी आहे आणि आमदार असल्याने मीच या योजनेचा अध्यक्ष व सचिव तहसीलदार आहे, असे सांगून सर्व अंगणवाडी सेविका यांना नियमबाह्य जबाबदारी देत स्वतःचा फोटो आणि, राजमुद्रा, खाली तहसीलदार सचीव व आमदार अध्यक्ष असा उल्लेख आहे. असे अर्ज राजकीय प्रसिद्धीकरिता छापले व ते अर्ज सर्व ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविकाकडे जबरदस्तीने जबाबदारी लादून हे फॉर्म लाभार्थी महिलांना देऊन भरून घ्या असे आदेश दिले. तर काही गावांत फॉर्मची विक्री सुद्धा झाली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे विरोधकांनी सांगितले. योजनेत कुणी महिलांची फसवणूक करू नये केल्यास त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. यामध्ये जर कुणी प्रशासकीय अधिकारी त्यांना साथ देत असेल तर जिल्हाधिकारी यांनी अश्या अधिका:यांवर कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

तहसीलदारांनी निर्गमित केले आदेश
तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी गटविकास अधिकारी आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे नावाने पत्र काढून सदर अर्जाचा गैरवापर होत असल्यास फॉर्म चे वितरण तात्काळ बंद करावे, तसेच वितरण केलेले अशासकीय फॉर्म परत घेऊन शासकीय फॉर्म मध्येच अधिनस्थ कर्मचार्यांकडून माहिती भरून घ्यावी असे आदेश निर्गमित केले.