राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच; काँग्रेस नेत्याचे विधान

    16-Jul-2024
Total Views |

Chhagan Bhujbal is welcome if he joins Mahavikas Aghadi
 
 
मुंबई :
ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली. यावर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते नितीन राऊत यांनी मोठे विधान केले आहे.
 
मागील दोन अधिवेशन भुजबळ अस्वस्थ दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तणाव दिसतो. छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडी त्यांचा मन:पूर्वक स्वागतच करेल, असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
 
छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट अचानक झालेली नाही. तर त्यामागे काही कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बारामतीत भुजबळांनी शरद पवारांबद्दल जे काही वेडे वाकडे बोलले हे एक कारण होते. ज्या शरद पवारांनी आपल्याला राजकारणात संधी दिली, त्या शरद पवारांबद्दल आपण असे बोललो याची खंत भुजबळांना वाटली असावी आणि त्याच पश्चातापातून भुजबळ शरद पवारांना भेटले असावे, असा दावाही राऊत यांनी केला.