लाकुड धोड्यांनी बुजले पुलांची तोंडे

    16-Jul-2024
Total Views |
- पावसात लहान पुलावरुन वाहत आहे पाणी
 
bridges mouths covered with wooden sticks

 
परतवाडा :
डोंगर दऱ्यांमध्ये समावलेला मेळघाटात पावसाळा आला की अनेक भौतीक समस्या निर्माण होतात, त्यापैकी एक समस्या म्हणजे लाकुड, धोंड्यांनी बुजलेले लहान पुलांची तोंडे. याची वेळेवर स्वच्छता होत नसल्याने पाऊस आला की, पुराचे पाणी पुलावर जाण्याचा प्रकार घडतो.
 
धारणी मार्गावरील चिखलदरानजिक चिचखेडा येथे लहान पुल आहे. या पुलाखाली पुराचे पाणी वाहून जावे याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. मात्र या पाईपमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आलेले लाकूड, धोंडे अडकल्याने नदीचा मुख्य प्रवाह बाधित होऊन आजुबाजूला असलेल्या शेतात पुराचं पाणी घुसले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान होऊ शकते. पहिल्याच पावसात नदी प्रवाहात मोठे लाकडी ओंडके व जंगलातील काडी कचरा वाहून आल्याने रहदारीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे शेती रखडून वाहुन जाण्याची शक्यता असल्याचे स्थानिक चीचखेडा येथील शेतक:यांना वाटत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखलदरा यांनी या प्रकाराकडे लक्ष देवून त्वरित चिखलदरा तालुक्यातील गावालगत असलेल्या नदी वरील लहान पुलाचे तोंडे मोकळे करून स्थानिक आदिवासी व इतर शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसाना पासून वाचवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.