बोखारा येथे भाजपा महिला आघाडी मेळावा

    16-Jul-2024
Total Views |
BJP Mahila Aghadi meeting in Bokhara
 (Image Source : Internet/ Representative)
 
वाडी :
भाजपा वाडी मंडळाच्या वतीने बोखारा येथील स्मृतीनगर मध्ये महीलांचा मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना, महिलांकरीता महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व नवीन मतदारांचे फार्म भरण्याविषयीचे मार्गदर्शन भाजपा वाडी मंडळ महिला आघाडी अध्यक्षा कल्पना सगदेव यांनी केले.
 
याप्रसंगी भाजपा वाडी मंडळाचे अध्यक्ष आनंदबाबु कदम, भाजपा ऊत्तर भारतीय आघाडी जिल्हा अध्यक्ष अर्जुन सिंह ठाकुर, ज्ञानेश्वर ढोक,बोखारा अध्यक्ष मोरेश्वर वराडकर, कार्याध्यक्ष मंगेश सावरकर, मनोरमा येवले, वर्षा डेंगे, रजनी वर्मा, दिपा डांगे व महिला उपस्थित होते.