‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 30 हजार 956 महिलांनी केले अर्ज

    16-Jul-2024
Total Views |

30956 women applied for CM Majhi Ladki Bahin Yojana
 
वर्धा :
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. जिल्ह्यात 15 जुलै पर्यंत एकूण 30 हजार 956 महिलांनी नोंदणी केली आहे. 17 हजार 852 महिलांनी ऑनलाइन तर 13 हजार 104 महिलांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत.
 
वर्धा तालुक्यातील 5 हजार 401, सेलू तालुक्यातील 3 हजार 515, देवळी तालुक्यातील 2 हजार 810, समुद्रपूर तालुक्यातील 2 हजार 97, हिंगणघाट तालुक्यातील 3 हजार 156, आर्वी तालुक्यातील 4 हजार 344, आष्टी तालुक्यातील 1 हजार 875, कारंजा तालुक्यातील 1 हजार 414 व शहरी भागातील 6 हजार 434 महिलांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने यांनी केले आहे.