दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात

    16-Jul-2024
Total Views |

10th 12th supplementary exams starts from today
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट- २०२४ मध्ये पुरवणी परीक्षेचे आयाेजन केले आहे. त्यानुसार आजपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली.
 
दहावीची परीक्षा येत्या ३० जुलै तर बारावीची परीक्षा ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. यंदा दहावीला २८ हजार ९७६ आणि बारावी पुरवणी परीक्षेसाठी एकुण ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.नागपूर विभागातून इयत्ता १०वी साठी २६०० तर १२वी साठी ६७०० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
 
दरम्यान सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता व दुपार सत्रात अडीच वाजता परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे गरजेचे आहे. सकाळ सत्रात अकरा आणि दुपार सत्रात दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.