- क्विक हिल फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा, सायबर सुरक्षा’ उपक्रमात सहभाग
(Image Source : Internet)
नागपूर :
रामदेवबाबा विद्यापीठातील चार विद्यार्थी क्विक हील फाऊंडेशनसोबत "सायबर शिक्षा, सायबर सुरक्षा" उपक्रमात सहभागी होत ‘सायबर वॉरियर’ बनले आहेत. पुण्यातील विमाननगर येथील क्विक हील कार्यालयात या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट सायबर सुरक्षेबाबत जागृती वाढवणे व शिक्षण देणे हे होते.
रामदेवबाबा विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन विभागच्या प्रमुख डॉ. प्रीती वोडीटेल, प्रो. पुनम खंडारे आणि डॉ. सत्यजीत उपरकर यांच्या मार्गदर्शनात राज पांडे, रिया सक्सेना प्रतिक अमनेरकर, सिया ठाकूर या विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले.
क्विक हिलचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय शिर्के यांनी सायबर सुरक्षेचे महत्त्व विशद करून सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करण्यात तरुणांच्या भूमिकेवर जोर दिला. यावेळी सीएसआर एक्झेक्युटीव सुगंधा दाणी व गायत्री केसकर यांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
रामदेवबाबा विद्यापीठ व क्विक हिल फाउंडेशनच्या या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असून भविष्यात डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यात मदत होणार आहे. रामदेवबाबा विद्यापीठाचे व्यवस्थापन, कुलपती डॉ. एस.एस. मंथा, कुलगुरू डॉ. आर. एस. पांडे आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीयरींगच्या संचालक डॉ. उर्मिला श्रावणकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.