लाव्ह्यात आरोग्य शिबीर

    20-Jun-2024
Total Views |
 
lavaa health camp
 
वाडी :
लाव्हा ग्रामपंचायत व आयकॉन हॉस्पीटल नागपूर यांच्या सयुंक्त सहकार्याने आरोग्य शिबीर सरपंच ज्योत्सना नितनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. आयकॉन हॉस्पीटलचे डॉ. इंद्रायणी हटवार, डॉ. रोशन परवेज, आरोग्यसेविका स्वाती बोबडे, गौरव गाणार,रीता लील्हारे , अपेक्षा रामटेके आदींनी १५६ नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.शिबिरात माजी पं. स.उपसभापती सुजीत नितनवरे ग्रा.पं. सदस्य आकाश पवार, कपिल खडसे, सुनंदा चोखांद्रे, पूजा तभाने, शारदा मरसकोल्हे, मनीषा कुमरे , धनराज गोरले ,अंगणवाडी सेविका स्वाती सोनबावणे रवींद्र नितनवरे , योगेश्वर लोखंडे , बळीराम धोगंडे ,चरण धोगंडे व गावकरी उपस्थित होते.