नागपूर : 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिवस म्हणून सर्वत्र साजरा केल्या जातो. उद्या जिल्ह्यात जागतिक ह्द्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. हृदयाचा वापर करा, हृदयाला जागा. (यूज हार्ट, नो हार्ट) ही यावर्षीची संकल्पना आहे. यासाठी जिल्हास्तराव राज्य शासनाने स्टेमी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊ या, स्टेमी प्रकल्प!
जिल्ह्यात स्टेमी प्रकल्प
जिल्ह्यात हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यासाठी स्टेमी प्रकल्प स्टेमि प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. स्टेमी म्हणजे एसटी ए लीव्हेशन इन मायोकार्डियल इंफारक्षण, नागपूर जिल्ह्यामध्ये 13 ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयमध्ये हा प्रकल्प राबविल्या जात असून हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अर्धा तासाच्या आत औषधोपचार करुन मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि तीव्र हृदयविकाराच्या झटक्याची चिन्हे ओळखण्यासह लवकर उपचार घेण्यासाठी व जास्तीत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट्य आहे. काही दशकांमध्ये कोरोनरी आर्टरी रोगांमुळे मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील 3 ते 4 टक्के आणि शहरी भागात 8 ते 10 टक्के व्यक्तींना हृदय रोग असल्याची चिंता राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात हृदयविकार व त्यासंबंधित आजार प्रामुख्याने आढळून येत आहेत. राज्यामध्ये हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी हृदयविकाराचा झटका हा आजार प्रथम क्रमांकावर येतो.
हृदय विकाराची प्रमुख कारणे उच्च रक्तदाब व मधुमेह हे आजार असणे, अनुवांशिकता, असंतुलित आहार, शारिरीक हालचाली कमी असणे, किया न करणे, तंबाखूचे व्यसन, मद्यपान इत्यादी व्यसन, दैनंदिन जीवनशैली, मानसिक तणाव प्रतिबंधात्मक उपायः संतुलीत व पौष्टीक आहार, नियमित व्यायाम (दिवसातून ३० मिनिटे), तंबाखु व मद्यपान इत्यादी व्यसना पासून दुर राहणे. स्टेमी योजनेत स्पोक व हब हे मॉडेल वापरण्यात येत आहे. स्पोकमध्ये उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात 13 ठिकाणी स्पोक स्थापन करण्यात आले आहे. यात इसीजी करुन 10 मिनिटांच्या आत हृदयविकाराचा झटका आला आहे की नाही याची तपासणी केली जाईल. आला असेल तर तत्काळ रक्तगुठळी पातळ करण्याची औषध तज्ज्ञांच्या मार्गदर्शना खाली दिली जातात. हब मध्ये मोठी व खासगी रुग्णालये जिथे हृदयरोग तज्ज्ञ उपलब्ध असतात आणि जिथे हृदय रोग शस्त्रक्रिया केली जाते. जिल्ह्यामध्ये आशा हॉस्पिटल, कामठी रोड, शुअरटेक हॉस्पिटल, जामठा, लता मंगेशकर रुग्णालय, बडी व लता मंगेशकर रुग्णालय, हिंगणा याठिकाणी अजिओग्राफी, अजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. या प्रकल्प अंतर्गत ३१६६० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 447 स्टेमी ईसीजी आढळून आल्या,