वाडी : लाव्हा येथील सोनबा नगरमधील अशोका बुद्ध विहारात नि:शुल्क रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उदघाटन सरपंच ज्योत्सना नितनवरे यांच्या हस्ते, उपसरपंच रॉबीन शेलारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश चोखांद्रे, माजी जि.प. सदस्य सुजित नितनवरे, आयोजक माजी उपसरपंच अनिल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.सेंट जोसेफ हॉस्पीटल येरला यांच्या सहकार्याने डॉ. शार्मीन कुटीनो,डॉ. देशकर , डॉ. कार्तिकी केसरवाणी, आरोग्य सेविका निकिता कावळे, प्रीती कुजूर, अजय मेश्राम , रोशन डेहनकर, चेतन चौधरी यांनी १२५ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.
संचालन मुकुंद हाडके यांनी केले. शिबीरात महात्मा ज्योतिबा फुले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मिळणारा लाभ व आयुष्यमान भारत संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. आयोजनासाठी लाव्हाचे माजी उपसरपंच अनिल पाटील , शुक्राचार्य मेश्राम , मुकुंद हाडके , डॉ. लांजेवार, मंजुश्री महीला मंडळ सोनबानगर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते सरीता गवळी, सुनीता मेश्राम, किरण पाटिल, ज्योती भोजकर, स्वाती उके, माधुरी हाडके, सुनीता डोंगरे, राजश्री नाईक, बंडू भोजकर, तुकाराम येडे, चरणदास डोंगरे, आतिश घोडके, सम्यक पाटिल, अश्विन मेश्राम, प्रतीक हाडके यांनी सहकार्य केले.