फ्रंट लाईन व हेल्थ केअर वर्कर करीता कोवीड -19 प्रिकॉशन डोज!

    22-Jun-2023
Total Views |

Vaccine - Abhijeet Bharat 
नागपूर : कोवीड -19 लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत नाकाद्वारे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीचा वापर 60 वर्षावरील नागरीकांच्या प्रिकॉशन डोज करीता महाल रोग निदान केंद्र मनपा नागपूर येथे सुरु आहे. यापुढे इन्कोव्हॅक लसीचा वापर 60 वर्षावरील नागरीकांच्या प्रिकॉशन डोज साठी तसेच फ्रंट लाईन वर्कर व हेल्थ केअर वर्कर यांना प्रिकॉशन डोज देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व 18 वर्षावरील हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर तसेच 60 वर्षावरील जेष्ठ नागरीक यांनी त्यांच्या प्रिकॉशन डोज करीता महाल रोग निदान केंद्र मनपा नागपूर येथे संपर्क करावा, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागा मार्फत करण्यात येत आहे. नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ.गोवर्धन नवखरे यांनी माहिती दिली.