300 आपला दवाखान्याचे उद्घाटन; राज्यातील आठ कोटी लोकांना दिले जाणार मोफत उपचार

    01-May-2023
Total Views |

300 Inauguration of apla  hospital Free treatment will be given to eight crore people in the state - Abhijeet Bharat
 
 
नागपूर : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 500 आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज 300 आपला दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात बोलताना ही माहिती दिली. यासोबतच त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या विस्ताराबाबत सांगितले.
 
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक चांगली योजना सुरू करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 5 लाख आणि आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 5 लाखांना मोफत उपचार मिळत आहेत. सुमारे 900 ऑपरेशन्स आणि उपचार मोफत केले जाणार आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातील १२ कोटी लोकांपैकी ८ कोटी लोकांना आम्ही मोफत उपचार देऊ.या योजनेद्वारे किडनी प्रत्यारोपणासाठी चार लाखांहून अधिक रक्कम दिली जाते. आरोग्याचा बोजा सर्वसामान्यांवर पडू नये, असा विचार आपण करत आहोत. आम्ही या योजनेत रुग्णालयांची संख्या वाढवत आहोत,” असे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
आपल्या दवाखाना बद्दल माहिती देताना ते म्हणाले, 'ही खूप चांगली संकल्पना आहे. विविध सेवा मोफत दिल्या जातील. रुग्णालयात विविध तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शनही केले जाणार आहे. फडणवीस म्हणाले की, सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम सुरू होत आहे.
 
“मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला ही संकल्पना मांडली. तानाजी सावंत यांनी ही संकल्पना यशस्वी करण्याचा निर्धार केला. मुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना ठाण्यात सुरू केली. माविआचे सरकार असताना त्यांनी त्यांच्या रुग्णालयाची घोषणा केली, ते एक रुपयात रुग्णालय देणार असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र अडीच वर्षांत एकही क्लिनिक सुरू होऊ शकले नाही. पण तुमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वात 500 दवाखाने सुरू करण्याची घोषणा केली आणि तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन महिन्यांत 300 दवाखाने सुरू होत आहेत. उर्वरित सेवा लवकरच सुरू होतील.
 
जिल्ह्यात 12 ठिकाणी शुभारंभ
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्ह्यात बारा ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांचा प्रामुख्याने समावेश आहे. शहरातील डोरले ले आऊट, ग्रामीणमधील हिंगणा, कामठी, कुही ,मौदा, वाडी, मोवाड ता. नरखेड, पारशिवणी, रामटेक, थापा ता. सावनेर, उमरेड आणि भिवापूर अशा एकूण 12 ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.