केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर न करता काढा होळीचे रंग; जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

    07-Mar-2023
Total Views |

Home Remedies for removal of Holi Colours
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर:
आपण सर्वजण मोठ्या उत्साहात होळी साजरी करतो. मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण होळीची आतुरतेने वाट पाहत असतात. पण हे होळीचे रंग शरीरावरून कसे काढायचे हे नाही म्हंटलं तरी खूप अवघड काम आहे. हे रंग काढण्यासाठी आपण बाजारात मिळणारे विविध प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो. हे ते महागडे आणि केमिकलयुक्त उत्पादने न वापरता घरगुती अगदी सोपे उपाय करूनही तुम्ही होळीचे पक्के रंग सहज काढू शकता. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल...
 
१. एका भांड्यात दही आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. आता शरीराच्या ज्या भागांवर रंग लागला आहे, त्यावर हे मिश्रण लावा. नंतर गरम पाण्याने आंघोळ करा.
 
२. एका भांड्यात बेसन, बदामाचे तेल आणि साय आणि गुलाबपाणी एकत्र करा. मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगले मिसळा. आता शरीराच्या ज्या भागांवर रंग लागला आहे त्यावर हे मिश्रण लावा. त्वचेवरील पेस्ट सुकल्यानंतर हलक्या हाताने चोळून काढून टाका.
 
चेहऱ्यावर रंग लागला असल्यास
१. चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी चेहरा अजिबात चोळू नका. चेहऱ्याला लावण्यास क्लीन्झर, बेबी ऑइलचा वापर करा. तसेच चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर लावा. साबणाने चेहरा अजिबात धुवू नका.
२. फेसवॉशने चेहरा साफ करण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा.
३. एका भांड्यात गव्हाचे पीठ आणि तेल एकत्र करून उबटन बनवा. हे उबटन चेहऱ्यावर लावून काही मिनिटांपर्यंत हलक्या हातांनी मसाज करा. आता क्लिन्जरच्या मदतीने चेहरा धुवा.
4. रंगांमुळे चेहऱ्यावर होणारी खाज सुटण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाबपाणी एकत्र करून कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.
५. एका भांड्यात दोन चमचे मसूर डाळ, एक चमचा बेसन, गुलाबपाणी आणि चिमूटभर हळद घालून पेस्ट बनवा. उबटन चेहऱ्यावर १० मिनिटे लावल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
६. एका भांड्यात एक चमचा सोयाबीनच्या पिठात दूध, ग्लिसरीन आणि चिमूटभर मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करा. चेहऱ्यावर लावा. नंतर ते कोरडे झाल्यानंतर हलक्या हातांनी ५-८ मिनिटे चोळा आणि कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

Home Remedies for removal of Holi Colours (Image Source : Internet/ Representative)
 
केसांमध्ये रंग गेल्यास
१. रंग खेळण्यापूर्वी अंगावर ऑलिव्ह, नारळ किंवा बदामाचे तेल लावा. तेल लावल्याने शरीरातील रंग सहज काढून टाकण्यास मदत होईल.
२. रंग खेळल्यानंतर लगेच केस धुणे टाळा. अंड्यातील पिवळ बलक (कच्चे) आणि दही यांचे मिश्रण केसांमध्ये ४५ मिनिटे ठेवा आणि केस सौम्य शाम्पूने धुवा.
३. केस शॅम्पूने धुण्यापूर्वी फक्त एक तास आधी केसांना नारळाचे दूध लावा.
४. एका भांड्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल, चार चमचे मध आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण टाळू आणि केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.