'गुंतता... हृदय हे' हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर संगीतमय चर्चा

    15-Feb-2023
Total Views |

heart disease
(Image Source : Internet/ Representative image)
 
नागपूर :
नागपुरातील श्रीमती कमलाबाई देशपांडे मेमोरियल ट्रस्ट यांच्या सौजन्याने ऋतुराज प्रस्तुत हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर संगीतमय चर्चेचा कार्यक्रम 'गुंतता... हृदय हे' चे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीनगरातील आठ रस्ता चौक येथील दि सायंटिफिक सोसायटी सभागृहात शुक्रवार १७ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्यकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून एम. डी. मेडीसिन डॉ. प्रभाकर के. देशपांडे हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर चर्चेत सहभागी होतील.
या कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तापस यांची असून कार्यक्रमाचे निवेदन किशोर गलांडे करतील. यावेळी गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य-अय्यर, मुकुल पांडे ही गायक मंडळी कार्यक्रमाच्या संकल्पनेनुरूप गीते सादर करतील तर त्यांना परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्त्र, पंकज यादव,विशाल दहासहस्त्र, मुग्धा तापस साथ संगत करतील. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून श्रोत्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ऋतुराज तर्फे करण्यात आले आहे.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.