कीर्ती फाउंडशेनची 11 नोव्हेंबरला ‘दीप संध्या’

    08-Nov-2023
Total Views |
 
kirti-foundation-deep-sandhya-event-nagpur - Abhijeet Bharat
 
नागपूर : कीर्ती फाऊंडेशनतर्फे दिवाळीनिमित्त ‘दीप संध्या’ या संगीतमय कार्यक्रमाचे शनिवार, 11 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. नरकेसरी लेआऊट, जयप्रकाश नगर, ‘आमराई ग्राऊंड’ येथे संध्याकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम होईल. सुप्रसिद्ध गायक निरंजन बोबडे हा कार्यक्रम प्रस्‍तुत करणार आहेत. यात निरंजन बोबडे, पार्वथी नायर, यश खेर व अनघा क‍िटकुले हे गायक कलाकार विविध गीते सादर करतील. कार्यक्रमाचे निवेदन आसावरी गलांडे करणार आहेत.
 
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार अनिल सोले, माजी महापौर संदीप जोशी, डॉ. विलास डांगरे, उद्योजक पराग खोत आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा रसिकांनी आनंद घ्‍यावा, असे आवाहन कीर्ती फाऊंडेशनचे अध्‍यक्ष किशोर धर्मे व सचिव विशाल महाजन यांनी केले आहे.