- आयुर्वेद व्यासपीठ व आरोग्य भारतीचे संयुक्त आयोजन
नागपूर : आयुर्वेद व्यासपीठ नागपूर शाखा आणि आरोग्य भारती नागपूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 10 नोव्हेंबरला धन्वंतरी जयंतीनिमित्त राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. रेशीमबाग येथील स्मृतिभवन परिसरातील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात शुक्रवारी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राधा मुंजे राहणार आहेत, तर दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालयाचे वैद्य माधव आष्टीकर हे प्रमुख वक्ता राहणार आहेत. ते ‘आइए, मिलिए मिलेट्स से’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात वैद्य अरुण भटकर, डॉ. संदीप मुरलीधर पथे, वैद्य यु. आर. शेखर नंबुरी, डॉ. एम.ए. राव, डॉ. गिरीश चरडे, संजय पाठक आदी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष वैद्य श्रीकांत वणीकर, कार्यवाह वैद्य सूरज पिसे, आरोग्य भारतीचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध मुर्हार, कार्यवाह अशोक गव्हाणे यांनी केले आहे.